Tech Tips: Can you charge your laptop using a car’s USB port? Know these things first…

Laptop Using Car s USB Port: आजच्या काळात लॅपटॉप हा अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. ऑफिसचे काम असो, ऑनलाइन शिक्षण असो किंवा प्रवासात एखादे प्रेझेंटशेन पूर्ण करायचे असो, लॅपटॉपची गरज कधीही लागू शकते. पण प्रवासात एक अडचण अनेकांना येते, ती म्हणजे बॅटरी संपणे, अशावेळी अनेकजण कारमध्ये असलेल्या USB पोर्टला लॅपटॉप जोडून चार्ज करण्याचा प्रयत्न करतात. हे सोयीचे वाटत असले तरी प्रत्येकवेळी हा पर्याय योग्य ठरेलच असे नाही.

लॅपटॉप कमी वेगाने चालतो…

कारमधील साधा USB पोर्ट मुख्यत: मोबाईल चार्ज करणे, गाणी ऐकण्यासाठी फोन जोडणे किंवा डेटा ट्रान्सफर यासाठी तयार केलेला असतो. त्यामुळे तो लॅपटॉपला आवश्यक असणारी पुरेशी वीज देऊ शकत नाही. परिणामी लॅपटॉप अपेक्षित वेगाने चार्ज होत नाही.

अनेकवेळा असे दिसून येते की लॅपटॉप चार्जिंगला लावलेला असतो, पण बॅटरीची टक्केवारी वाढण्याऐवजी कमी होत जाते. कारण लॅपटॉप वापरताना जितकी ऊर्जा खर्च होते जाते. त्यापेक्षा कमी ऊर्जा USB पोर्टमधून मिळत असते. त्यामुळे चार्जिंग सुरू असूनही बॅटरी रिकामी होत राहते.

USB-C पोर्ट कोणत्या उपकरणांसाठी असते?

काहींना असे वाटते की, कारमध्ये USB-C पोर्ट असेल तर कोणतीही अडचण येणार नाही. मात्र हा गैरसमज आहे. प्रत्येक USB-C पोर्टची क्षमता सारखी नसते. अनेक गाड्यांमध्ये दिलेले USB-C पोर्ट फक्त मोबाईल किंवा इतर छोट्या उपकरणांसाठी असतात. त्यामुळे लॅपटॉपला लागणारी जास्त पॉवर त्यातून मिळेलच, याची खात्री नसते. (Tech Tips:)

WhatsApp ग्रुप चॅट्समध्ये आले 3 मोठे फिचर्स, रोजच्या आयुष्यात कसा करणार वापर? जाणून घ्या सविस्तर

वारंवार कमी क्षमतेच्या पोर्टमधून लॅपटॉप चार्ज करण्याचा प्रयत्न केल्यास चार्जिंगची कार्यक्षमता कमी होऊ शकते. काही वेळा कारच्या USB पोर्टवरही अतिरिक्त ताण येतो. आधुनिक लॅपटॉपमध्ये सुरक्षिततेसाठी अनेक सुविधा असल्या तरी चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करणे टाळलेलेच चांगले.

चार्जर कारच्या 12V सॉकेटमध्ये लावता येतात

प्रवासादरम्यान लॅपटॉप चार्ज करण्यासाठी योग्य पर्याय वापरणे अधिक फायदेशीर ठरते. बाजारात USB Power Delivery (PD) सपोर्ट असलेले कार चार्जर उपलब्ध आहेत. हे चार्जर कारच्या 12V सॉकेटमध्ये लावता येतात आणि लॅपटॉपला आवश्यक असलेली जास्त पॉवर पुरवू शकतात. त्यामुळे चार्जिंग वेगवान आणि सुरक्षित होते.

जर तुमच्या लॅपटॉपला अधिक पॉवरची गरज असेल, तर पॉवर इन्व्हर्टर हा देखील चांगला पर्याय ठरू शकतो. याच्या मदतीने कारमधील वीज घरातील सॉकेटप्रमाणे वापरता येते. त्यामुळे लॅपटॉपचा मूळ चार्जर वापरून कोणत्याही अडचणीशिवाय चार्जिंग करता येते.

boAt आणि Spotify Premium ची मोठी घोषणा! ऑडिओ जगतात ऐतिहासिक भागीदारी; ४ महिने मोफत ऐका आवडती गाणी!

कारमध्ये फोन चार्जिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?

  • कारचे इंजिन बंद असताना बराच वेळ लॅपटॉप चार्ज केल्यास गाडीच्या बॅटरीवर परिणाम होऊ शकतो.
  • शक्यतो इंजिन सुरू असताना चार्जिंग करावे किंवा गरज नसताना लॅपटॉप जोडून ठेवू नये.
  • स्वस्त किंवा निकृष्ट दर्जाच्या केबल आणि चार्जरचा वापर टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
  • चांगल्या दर्जाचे अॅक्सेसरीज वापरल्यास लॅपटॉप सुरक्षित राहतो आणि चार्जिंगमध्येही कोणतीही अडचण येत नाही.

थोडक्यात सांगायचे झाले तर, कारमधील साधा USB पोर्ट हा लॅपटॉप चार्ज करण्यासाठी तयार केलेला नसतो. त्यामुळे त्यावर अवलंबून राहणे योग्य नाही. प्रवासात लॅपटॉपची बॅटरी टिकवायची असेल तर योग्य क्षमतेचा कार चार्जर किंवा पॉवर इन्व्हर्टर वापरणे हा अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय आहे. योग्य पद्धतीने चार्जिंग केल्यास लॅपटॉपचे आयुष्यही चांगले राहते आणि प्रवासात काम करताना कोणतीही अडचण येत नाही.

Leave a Comment